News Flash

खडसेंनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली,आरपीआयमध्ये यायला हवं होतं-आठवले

रामदास आठवले यांनी केला बारामती दौरा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं असं वक्तव्य आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. बारामती तालुक्यातील कऱ्हावागज या ठिकाणी त्यांनी पुराने नुकसन झालेल्या भागांची पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम केल्याबद्दल प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना रामदास आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपाचे १६ आमदार फुटणार अशीही चर्चा होती मात्र असे काहीही होणार नाही असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?

“एकनाथ खडसे हे आमदार नाहीत. त्यांना तिथे आमदारकी मिळण्याची शक्यता आहे तसंच त्यांना मंत्रिपदही मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत जायला नको होतं. त्यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी चूक केली”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 7:51 pm

Web Title: ramdas athavale reacts on eknath khadse decision about bjp scj 81
Next Stories
1 मुंबईत पुन्हा वीजपुरवठा खंडीत होऊ नये म्हणून ऊर्जा मंत्र्यांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
2 भाजपामध्ये अस्वस्था वाढली, बाळासाहेब थोरातांनी सांगितलं यामागचं कारण
3 दुष्काळाला कंटाळून अडीच एकरात ड्रॅगन फ्रुटची लागवड, परतीच्या पावसाने अख्खं पिक भुईसपाट
Just Now!
X