शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपाला फरक पडत नाही असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ‘शरद पवार आणि राज ठाकरे भेटीचा आणि त्यांनी सोबत निवडणूक लढवली तरी भाजपला काही फरक पडत नाही. कारण भाजपा नशिबाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही’, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गुरुवारी दोन्ही नेते एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. राज ठाकरे आज विदर्भ दौरा आटोपून औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

राज ठाकरे आणि शरद पवारांचा एकत्र प्रवास! विमानात राजकीय खलबतं ?

रावसाहेब दानवे यांनी पुढे बोलताना शिवस्मारक राजभवनच्या जागी उभारावे या मताशी आम्ही सहमत नसल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवस्मारक राजभवनात उभारलं गेलं पाहिजे अशी मागणी केली आहे.

अरबी समुद्रात नाही तर राजभवनात उभारा शिवस्मारक, पुरुषोत्तम खेडेकर यांची मागणी

मागच्या सरकार पासून ही प्रक्रिया सुरू आहे. भूमिपूजन झालं आहे. आता स्मारक उभारण्याची प्रक्रियादेखील सुरू झालीये. आता असे वक्तव्य करून काही बदल होईल असं वाटत नाही. राज्य सरकार हे शिवस्मारक लवकर कसं उभं राहिलं यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच पायाभरणी वेळी झालेली दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाही यासाठी सरकार उपाययोजना करेल असं रावसाहेब दानवे बोलले आहेत.