News Flash

बुलढाणा जिल्हय़ात अपंग मुलीवर बलात्कार

पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बुलढाणा जिल्हय़ाच्या संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथे एका नराधमाने अपंग मुलीवर दिवाळीच्या दिवशी दुपारी बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काकनवाडा खुर्द येथील आरोपी सोपान गजानन रसाळे (३४) याने एका २१ वर्षीय जन्मत: बोलता येत नसलेल्या अपंग मुलीला शौचालयात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. घटनेच्या वेळी मुलगी व तिची आई नळावरून पाणी भरत होती. रिकामे भांडे भरून आणण्यासाठी गेलेली मुलगी बराच वेळ घरी परतली नाही. जवळच एका घरासमोरील प्रसाधनगृहात ती रडत असल्याचा आवाज आल्यावर पाहिले असता आरोपी सोपान रसाळे बळजबरीने अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. दरम्यान, आरोपीला चोप देऊन पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. आईने थेट तामगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:01 am

Web Title: rape of a disabled girl in buldhana district abn 97
Next Stories
1 अधिवेशन मुंबईला स्थलांतरित करणे नागपूर करारातील अभिवचनाचा भंग
2 बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून विद्यार्थिनीचा मृत्यू
3 दिलासादायक : राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
Just Now!
X