06 August 2020

News Flash

मद्य-मांसाच्या पैशासाठी रेल्वेमध्ये दरोडय़ाचा कट

पुर्णा-अकोला रेल्वेवर बोल्डा, नांदापूरदरम्यान रेल्वेवर दरोडा टाकून अनेकांना जखमी करून महिलांचे दागिने लुटून फरारी झालेल्या चार आरोपींना पकडण्यात िहगोली पोलिसांना यश आले. मद्य व मांस

| August 19, 2014 01:20 am

पुर्णा-अकोला रेल्वेवर बोल्डा, नांदापूरदरम्यान रेल्वेवर दरोडा टाकून अनेकांना जखमी करून महिलांचे दागिने लुटून फरारी झालेल्या चार आरोपींना पकडण्यात िहगोली पोलिसांना यश आले. मद्य व मांस खाण्या-पिण्यासाठी पसे कमी पडत असल्याने चोरी व दरोडय़ातून झटपट पसे मिळविण्याचा हा मार्ग शोधला. परभणी उद्यानात दरोडय़ाचा कट शिजल्याची कबुली दरोडय़ातील आरोपींनी पोलीस तपासात दिली.
आरोपी शेख गफार हा रेल्वेमध्ये पाण्याच्या बाटल्या विक्रीचा, तर चंद्रपूर येथील संदेश ऊर्फ शिवा पटले परभणी येथेच बुट पॉलिश व्यवसाय करीत होता. या व्यवसायातून त्यांना मद्य-मांसासाठी लागणारे पसे कमी पडत गेले. त्यामुळे त्यांनी गुन्हेगारीची वाट धरली. यात रेल्वेमध्ये चोऱ्या, दरोडा टाकण्यास सुरुवात केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2014 1:20 am

Web Title: robbery on train for rupees
टॅग Hingoli,Robbery
Next Stories
1 दुष्काळावर मात करण्याची हिंगोलीमध्ये पूर्वतयारी सुरू
2 धवलसिंह मोहिते पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
3 दोन लाखांसाठी विवाहितेचा खून
Just Now!
X