राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी सामाजिक कार्यकर्ते युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एकप्रकारे शह दिल्याचे मानले जात आहे. युवराज संभाजीराजे यांच्यामुळे भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील बळ वाढण्यास मदत होणार आहे. यापूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय पक्षांकडून युवराज संभाजीराजे व युवराज मालोजीराजे यांना गळाला लावण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, या प्रयत्नांना म्हणावे तितके यश आले नव्हते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2016 रोजी प्रकाशित
राष्ट्रपतींकडून युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर निवड
युवराज संभाजीराजे यांच्यामुळे भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील बळ वाढण्यास मदत होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 11-06-2016 at 21:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati nominated to rajya sabha