नितीन गडकरी आणि खव्वयेगिरी यांचं खूप जवळचं नातं आहे हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या वेबसंवादात नितीन गडकरी सहभागी झाले होते. प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विविध प्रश्न त्यांना विचारले आणि गडकरी यांनीही त्याला दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी खाण्याची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली हे विचारलं असता, गडकरी म्हणाले “लहानपणापासून मला फूटपाथवरचं, ठेल्यावरचं खाणं आवडतं”

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
bachhu kadu criticized police action
‘पोलिसच भाजपाचे कार्यकर्ते, आता आम्ही विष प्यावे का?’ बच्चू कडू यांचा उद्विग्न सवाल
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

“नागपुरातल्या चिटणीस पार्कात लहान असताना क्रिकेट खेळायचो. त्यानंतर चिटणीस पार्कबाहेर समोशाची गाडी लागायची तिथे एक समोसा आणि त्यासोबत मिळणारी ताकाची चटणी खूप आवडायची. त्यामुळे फूटपाथवर खायची सवय लागली. पाव भाजी, भेळ, सांबारवडी हे माझे आवडते पदार्थ आहेत. माझी पत्नी कांचन उत्तम सांबारवडी तयार करते. आमच्याकडे वर्षभर सांबारवडी तयार केली जाते. कुणी पाहुणे येणार असतील तर कांचन आवर्जून सांबारवडी तयार करते. मटरच्या कचोऱ्याही खूप आवडतात. पुण्यात गेलो की मस्तानी आईस्क्रिम मी आवर्जून खातो. पुण्यात आलो की मी सारंग काळेला सांगतो आणि मग सगळं शांत झालं की मस्तानी आईस्क्रिम खायला जातो. आम्ही मी शाकाहारी आहे त्यामुळे मला शाकाहारी पदार्थ खायला खूप आवडतात. तसंच गोडही पदार्थ भरपूर आवडतात, पण सध्या डायबेटिसमुळे मी गोड खाणं बरंच कमी केलं आहे. मुंबईतही मणीजमधले दाक्षिणात्य पदार्थ खायला आवडतात. एकदा दादरच्या जिप्सीमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे हृदयनाथ मंगेशकर आणि मोहन वाघ हे मला भेटले होते. दादरच्या नॅचरल्स आईस्क्रिम पार्लरमध्ये मी अनेकदा गेलो आहे. मला सामान्य माणसासारखं जीवन जगायला खूप आवडतं. कुणाला काय म्हणायचं ते म्हणू दे.. मला जे आवडतं ते मी करतो. नावं ठेवणाऱ्यांचा विचार मी करत नाही” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“मध्यंतरी इंदौरला गेलो होतो तिथे खाऊ गल्ल्यांमध्ये जाऊन साबुदाण्याची खिचडी, आलू पोहा यांचा आस्वाद आम्ही घेतला आहे. ही आठवणही नितीन गडकरी यांनी या वेबसंवादात सांगिली. आजही तुम्ही मला १०-२० हॉटेल्समधले पदार्थ माझ्यासमोर आणून ठेवले तर मी कोणता पदार्थ कोणत्या हॉटेलमधला आहे हे आवर्जून सांगू शकतो असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. यातूनच नितीन गडकरी हे पट्टीचे खव्वये आहेत हे स्पष्ट होतं. मराठी नाटकं, मराठी गाणी मला खूप आवडतात. मात्र मी आजवर एकही कार्यक्रम फुकट पाहिलेला नाही” हेदेखील त्यांनी सांगितलं.