News Flash

राज्यातील २१२ नगर परिषदांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर

२७ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात १६५ नगरपरिषदांमध्ये मतदान पार पडणार आहे.

राज्यातील २१२ नगरपरिषदांमधील निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स सहारिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
२१२ नगर परिषदांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून २७ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्यांमधील सर्वाधिक म्हणजेच १६५ नगर परिषदांमध्ये मतदान पार पडेल. दुस-या टप्प्याचं मतदान १४ डिसेंबरला पार पडणार असून यामध्ये लातूर आणि पुण्यातील १४ नगर परिषदांमध्ये मतदान पार पडेल. तिस-या टप्प्यात १८ डिसेंबर रोजी १२ नगर परिषदांमध्ये मतदान होईल. तर ८ जानेवारी रोजी चौथ्या टप्प्यात उर्वरित नगर परिषदांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. मतदानानंतर दुस-या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होईल असेही सहारिया यांनी स्पष्ट केले आहे.

२१२ नगर परिषदांमध्ये मुदत संपणा-या १९० नगर परिषदा, ४ नगर पंचायती, २ नवनिर्मित परिषदा आणि १६ नगरपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक असलेल्या नगर परिषदेच्या क्षेत्रात तसेच ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगर परिषदांमध्ये निवडणूक होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे असे सहारिया यांनी जाहीर केले. मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यावर आचारसंहिता संपुष्टात येईल असे ते म्हणालेत. २१२ नगर परिषदांमधील ४, ७५० जागांसाठी निवडणूक होणार असून यामध्ये २,४४५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ६०८, अनुसूचित जमातींसाठी १९८ तर मागासवर्ग प्रवर्गासाठी १,३१५ जागा आरक्षित आहेत.

कुठे, कधी होणार निवडणूक ?

२७ नोव्हेंबर
जिल्हा – पालघर
विक्रमगड (नवीन नगर पंचायत), तलासरी (नवीन न.पं.), मोखाडा (नवीन न.पं.)
जिल्हा – रायगड
खोपोली, उरण, पेण, अलिबाग, मुरूड-जंजिरा, रोहा, श्रीवर्धन, महाड, माथेरान
जिल्हा – रत्नागिरी
चिपळूण, रत्नागिरी, दापोली नगर पंचायत, खेड, राजापूर
जिल्हा – सिंधुदुर्ग
वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण, देवगड-जामसांडे (नवीन न.पं.)
जिल्हा – सोलापूर
बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी.
जिल्हा – कोल्हापूर
इचलकरंजी, जयसिंगपूर, मलकापूर, वडगाव-कसबा, कुरूंदवाड, कागल, मुरगुड, गडहिंग्लज, पन्हाळा.
जिल्हा – सांगली
इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव, कवठे-महाकाळ (नवीन नगर पंचायत.), कडेगाव (नवीन न.पं.), खानापूर (नवीन न.पं.), शिरोळा (नवीन न.पं.), पलूस (नवीन नगर परिषद).
जिल्हा – सातारा
सातारा, फलटण, कराड, वाई, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी, कोरेगाव (नवीन न.पं.), मेढा (नवीन न.पं.), पाटण (नवीन न.पं.), वडूज (नवीन न.पं.), खंडाळा (नवीन न.पं.), दहिवडी (नवीन न.पं.).
जिल्हा – नाशिक
मनमाड, सिन्नर, येवला, सटाणा, नांदगाव, भगूर.
जिल्हा – अहमदनगर
संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, रहाता, पाथर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा.
जिल्हा – नंदुरबार
शहादा.
जिल्हा – धुळे
शिरपूर-वरवाडे, दोंडाईचा-वरवाडे.
जिल्हा – जळगाव
भुसावळ, चोपडा, अंमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, बोदवड (नवीन न.पं.).
जिल्हा – जालना
जालना, भोकरदन, अंबड, परतूर.
जिल्हा – परभणी
गंगाखेड, सेलू, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ व पूर्णा.
जिल्हा – हिंगोली
हिंगोली, बसमतनगर, कळमनुरी.
जिल्हा – बीड
बीड, माजलगाव, परळी-वैजनाथ, अंबेजोगाई, गेवराई, धारूर.
जिल्हा – उस्मानाबाद
उस्मानाबाद, परांडा, भूम, कळंब, तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम, उमरगा.

१४ डिसेंबर
जिल्हा – पुणे
बारामती, लोणावळा, दौड, तळेगाव-दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड, शिरूर.
जिल्हा – लातूर
उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर.

१८ डिसेंबर
जिल्हा – औरंगाबाद
वैजापूर, कन्नड, पैठण, गंगापूर, खुल्ताबाद.
जिल्हा – नांदेड
धर्माबाद, उमरी, हदगाव, मुखेड, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर, अर्धापूर (न.पं.), माहूर (न.पं.).
जिल्हा – भंडारा
पवनी, भंडारा, तुमसर, साकोली (नवीन न.पं.)
जिल्हा – गडचिरोली
गडचिरोली, देसाईगंज

८ जानेवारी २०१७
जिल्हा – नागपूर
कामटी, उमरेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, रामटेक, नरखेड, खापा, सावनेर.
जिल्हा – गोंदिया
तिरोरा, गोंदिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2016 4:46 pm

Web Title: schedule for 212 municiple council election declared
Next Stories
1 साखर कारखान्याने पैसे थकवले, सोलापूरमध्ये ५ शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
2 अ‍ॅट्रॉसिटी समर्थनार्थ नांदेडमध्ये विराट मोर्चा
3 अ‍ॅट्रॉसिटी कायदा कधीही रद्द होऊ देणार नाही -आठवले
Just Now!
X