19 September 2020

News Flash

नाशिकमध्ये 14 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार

नाशिकमध्ये एका 14 वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

(संग्रहित छायाचित्र)

नाशिकमध्ये एका 14 वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसतीगृहातील शिपायानेच हा लैंगिक अत्याचार केला आहे. बाळू धनवटे असं आरोपी शिपायाचं नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळू धनवटे पीडित मुलीला चॉकलेटचं अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत होता. वसतीगृहाच्या शौचालयातच हा प्रकार सुरु होता. गेल्या चार महिन्यांवर पीडित मुलीवर आरोपी अत्याचार करत होता. याबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारुन टाकू अशी धमकी आरोपीने दिली होती.

अखेर पीडित मुलीने हा सगळा प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. ऑडिओ रेकॉर्ड करत एका शिक्षिकेलाही यासंबंधी सांगण्यात आलं. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर आरोपी बाळू धनवटेवर बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. रात्रीच त्याला अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:36 pm

Web Title: sexual harassment of 14 year old girl in nashik
Next Stories
1 Elgaar parishad case: ‘गोन्साल्विस आणि परेरा माओवादी संघटनेसाठी तरुणांची भरती करत होते’
2 दिवाळीत सलग ५ दिवस बँका बंद
3 इकबाल कासकरला व्हीआयपी वागणूक देणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन
Just Now!
X