07 March 2021

News Flash

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून सुरुवातीचा खर्च एमएमआरडीए करणार आहे.

बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंत्रिमंडळाने निधी मंजूर केला आहे. स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून सुरुवातीचा खर्च एमएमआरडीए करणार आहे.

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून बैठकीत स्मारकासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य महत्त्वाचे निर्णय
१. दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.
२. मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.
३. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता.

स्मारकाचे उद्या गणेशपूजन ?

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारीला शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी गणेशपूजन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास उपस्थित राहतील, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 12:58 pm

Web Title: shiv sena chief balasaheb thackeray memorial maharashtra cabinet grant 100 crore
Next Stories
1 ‘हॅकर हा शेवटी चोरच, सय्यद शुजावर विश्वास नाही’
2 बीडमध्ये नात्याला काळीमा, नराधम बापाचा पोटच्या मुलीवरच बलात्कार
3 तलवारीने केक कापणे पडले महागात, वाढदिवसालाच घडली तुरुंगवारी
Just Now!
X