मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना नेत्यांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. याव्यतिरीक्त महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांनीही कंगनाला चांगलंच धारेवर धरलं होतं. कंगनावर टीका करताना संजय राऊत यांनी ‘हरामखोर मुलगी’ या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

याप्रकरणी संजय राऊत यांनी आज एक सूचक ट्विट करत विरोधकांना इशारा दिला आहे. पाहा, काय म्हणाले आहेत संजय राऊत…

ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना संजय राऊतांनी जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी देखील तिची माफी मागण्याचा विचार करेन असं म्हटलं आहे. कंगनाने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं, हेच अहमदाबादबद्दल बोलायची तिची हिंमत आहेत का?? असा सवालही यावेळी राऊतांनी केला. संजय राऊतांनी कंगनावर ‘हरामखोर’ अशी टिप्पणी केल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विट करत ते विधान योग्य नसल्याचं म्हटलं. दिया मिर्झाने राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.