News Flash

कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी साता-यात सह्य़ांची मोहीम

सातारा जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे, या मागणीसाठी खा.उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सह्य़ांची मोहीम सुरु केली. सातारा येथील प्रमुख ठिकाणी स्वाक्षरी करून त्यांनी या मोहिमेला प्रारंभ

| June 21, 2014 03:48 am

कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी साता-यात सह्य़ांची मोहीम

सातारा जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे, या मागणीसाठी खा.उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सह्य़ांची मोहीम सुरु केली. सातारा येथील प्रमुख ठिकाणी स्वाक्षरी करून त्यांनी या मोहिमेला प्रारंभ केला.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बठकीत त्यांनी विद्यापीठाचा ठराव एकमताने मंजूर केला होता.आता कृषी विद्यापीठासाठी सह्य़ांच्या मोहिमेस प्रारंभ केला आहे.ही मोहीम पोवई नाक्यापासून सुरु केली. खा. भोसलेंनी स्वत बलगाडीत स्वार होऊन या मोहिमेचे नेतृत्व केले. रॅली राजवाडा येथील श्री छ.प्रतापसिंह महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आली. खा.भोसले यांनी श्री छ.प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन स्वाक्षरी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले,सातारा येथे जैवविविधता आहे.हवा,पाणी ,माती तसेच वाहतुकीचे मार्ग आहेत. जिल्ह्यात साखर कारखाने,दूध प्रक्रिया केंद्र,कृषी महाविद्यालय ,पशू विद्यालय ,कृषी शाळा,उस,गहू संशोधन केंद्र आहे. त्यामुळे विद्यापीठ जिल्ह्यात व्हावे ,तसेच राष्टीय बटाटा संशोधन केंद्र पुण्याहून सातारा येथे आणावे म्हणून ही मोहीम आम्ही सुरु केली आहे. या वेळी सातारा विकास आघाडीचे नगर सेवक ,आघाडीचेच पंचायत समितीचे तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2014 3:48 am

Web Title: sign campaign demand for agricultural university in satara
टॅग : Demand,Satara,Wai
Next Stories
1 सत्तेत आल्यावर रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करणार- खोत
2 सांगलीत ‘पदवीधर’साठी २९ टक्के तर ‘शिक्षक’साठी ६२ टक्के मतदान
3 लांबलेल्या निकालाने तात्पुरत्या प्रवेशाच्या सूचना
Just Now!
X