News Flash

काही महिला संघटनांना लक्ष्मण माने यांचे जास्तच प्रेम- उदयनराजे

लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध महिलांनीच लैंगिक छळाच्या तक्रारी केलेल्या असताना काही महिला संघटनांना त्यांच्याविषयी थोडे जास्तच प्रेम वाटत आहे. मानेंविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत, कायद्याला

| April 3, 2013 03:43 am

लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध महिलांनीच लैंगिक छळाच्या तक्रारी केलेल्या असताना काही महिला संघटनांना त्यांच्याविषयी थोडे जास्तच प्रेम वाटत आहे. मानेंविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत, कायद्याला त्याचे काम करू द्यावे असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
माने प्रकरणात प्रथमच उदयनराजे म्हणाले, ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत, त्यांनी रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. अशावेळी त्या महिलांच्या पाठीमागे उभे राहण्याऐवजी काही महिला संघटनांना माने यांचेच जास्त प्रेम वाटत आहे, हे आश्चर्यकारक आहे. काहींकडून मानेंविरुद्ध गुन्हे दाखल होऊ नये यासाठीही प्रयत्न झाल्याचे आपण ऐकतो. कायद्याला त्याचे काम करू द्यावे, दबाव आणण्याचे काम कुणीही करू नये, असेही ते शेवटी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:43 am

Web Title: some womens assocation takeing more side of laxman mane udyan raje
टॅग : Laxman Mane
Next Stories
1 धुळे व चांदवड येथे लाच स्वीकारताना दोघांना अटक
2 एकतर्फी प्रेमातून नागपूरमध्ये प्राध्यापकाची हत्या
3 एलबीटीविरोधातील याचिका नागपूर हायकोर्टाने फेटाळल्या
Just Now!
X