करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचं मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. लहान मुलांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना शासनाने केली आहे. त्यामध्ये १३ तज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत.

करोना विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

आणखी वाचा- “महाराष्ट्रात लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल”

रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ञांशी संवाद साधून संभाव्य तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या उपचाराबाबत त्यांनी चर्चाही केली होती.

लहान मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचारपद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ञांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आणखी वाचा- Maharashtra Lockdown: लॉकडाउनसंबंधी विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले….

या टास्क फोर्समध्ये डॉ. विजय येवले, डॉ.बकुल पारेख, डॉ. बेला वर्मा, डॉ. सुधा राव, डॉ. परमानंद अंदनकर, डॉ. विनय जोशी, डॉ. सुषमा सावे, डॉ. जितेंद्र गव्हाणे, डॉ, प्रमोद जोग, डॉ. आरती किन्नीकर, डॉ. ऋषिकेश ठाकरे, डॉ. आकाश बंग यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आला आहे.