11 August 2020

News Flash

लोकबिरादरीस फाय फाऊंडेशनतर्फे दहा लाखांचा निधी

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या वरोरा-भामरागड (जि. गडचिरोली) मधील लोकबिरादरी प्रकल्पास इचलकरंजी येथील फाय फाऊंडेशनच्या वतीने दहा लाख रुपयांचा निधी पंडितराव कुलकर्णी यांनी दिल्याची

| November 25, 2013 12:12 pm

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या वरोरा-भामरागड (जि. गडचिरोली) मधील लोकबिरादरी प्रकल्पास इचलकरंजी येथील फाय फाऊंडेशनच्या वतीने दहा लाख रुपयांचा निधी पंडितराव कुलकर्णी यांनी दिल्याची माहिती संस्थेच्या वतीने डॉ. एस. पी. मर्दा यांनी दिली.
वरोरा येथे डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे हे आदिवासी जमातीसाठी आरोग्य, शिक्षण व पुनर्वसन असे तिहेरी काम करीत आहेत. अतिमागास वर्गातील आदिवासींचे जीवन उन्नत व्हावे, असे काम आमटे दाम्पत्य करीत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मॅगसेसे व लोकमान्य टिळक पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. डॉ.आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातून दरवर्षी अतिमागास आदिवासींवर उपचार केले जातात. फाय फाऊंडेशनने दिलेल्या दहा लाख रुपयांचा उपयोग आदिवासींच्या आरोग्य उपचारासाठी करणार आहोत, अशी माहिती डॉ. आमटे यांनी या वेळी दिली असल्याचे डॉ. मर्दा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2013 12:12 pm

Web Title: ten lakh fund to lok biradari by %e2%80%8b%e2%80%8bfi foundation
टॅग Kolhapur
Next Stories
1 ‘कुंभमेळ्यावर कोटय़वधींचा खर्च करणे अयोग्य’
2 आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा १७ डिसेंबरपासून
3 नक्षलवादी हल्ल्यातील शहिदांशी सापत्न वागणूक का?
Just Now!
X