News Flash

ईडीने शरद पवारांवर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही : मुख्यमंत्री

ईडीने शरद पवारांवर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

(संग्रहित छायाचित्र)

ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची कारवाई आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असं म्हणणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने हेतूपुरस्सर किंवा राजकीय हेतूने प्रेरित ही कारवाई केलेली नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर टीकेची झोड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून उठते आहे. मात्र राज्य सरकारचा या कारवाईशी संबंध नाही असं आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई ईडीने केली आहे. या गुन्ह्यामध्ये ७० जणांची नावं आहे. १०० कोटी पेक्षा जास्त रकमेचा जेव्हा कोणताही गुन्हा असेल तेव्हा त्यासंदर्भातली दखल ही ईडीला घ्यावीच लागते. अशा प्रकरणांमध्ये ईडी वेगळा एफआयर करत नाही. ईडीने केलेल्या या कारवाईशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार सूडबुद्धीने वागतं आहे, जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे, या प्रकारचे आरोप कालपासून होत आहेत त्याला काहीही अर्थ नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

” याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही.  त्यामुळे जाणीवपूर्वक कुणाला गुंतवण्याचा हेतू नाही. तसंच विधानसभा निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे.  ज्याला राजकारण कळतं त्याला हे कधीच वाटणार नाही की आम्ही हेतुपुरस्सर ही कारवाई केली  ” असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

आणखी वाचा-‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’, ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

मंगळवारी संध्याकाळी शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल केला. यानंतर शरद पवार यांच्यासह सगळ्याच विरोधकांच्या राज्य सरकारच्या विरोधात प्रतिक्रिया येत आहेत. राज्य सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केल्याचं विरोधक म्हणत आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईडीच्या कारवाईशी आमचा काहीही संबंध नाही असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2019 2:43 pm

Web Title: the action taken by ed on sharad pawar has nothing to do with the state government says cm devendra fadanvis
Next Stories
1 जाणून घ्या काय आहे शिखर बँक घोटाळा
2 शरद पवारांवर गुन्हा: राष्ट्रवादीची जोरदार निदर्शने, उद्या परळी बंदची हाक
3 शरद पवारांवर गुन्हा : पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको
Just Now!
X