News Flash

धक्कादायक! यवतमाळमध्ये अचानक आलेल्या पुरात मृतदेह गेला वाहून

वणी तालुक्यात घडली अजब घटना

संग्रहित, प्रातिनिधीक छायाचित्र

नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार सुरू असताना अचानकपणे आलेल्या पुरात सरणासह मृतदेह वाहून गेला. वणी तालुक्यातील पळसोनी येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

पळसोनी येथील सीताराम बापूराव बेलेकर (वय ५७) यांचे सोमवारी दुपारी अपघाती निधन झाले. शवविच्छेदनानंतर सायंकाळी त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला. गावालगत निगुर्डा नदीपात्र पूर्णपणे कोरडे असल्याने तिथेच अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. त्यानुसार काही नातेवाईक व गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. दरम्यान, चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळात नदीपात्रात अचानक पाण्याच्या प्रवाहाचा लोंढा आला. काही क्षणांतच नदी दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे उपस्थित लोकांची नदी पात्राबाहेर पडण्यासाठी चांगलीच धावपळ झाली. या पुरात सरणासह त्यावरील मृतदेहसुद्धा वाहून जायला लागला. जमलेल्या नागरिकांनी मृतदेह पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुरात वाहून गेला. या मृतदेहाचा शोध सुरू होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 7:26 pm

Web Title: the body was swept away in the sudden flood in yavatmal aau 85
Next Stories
1 दहावी, बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? वर्षा गायकवाड यांची महत्त्वाची माहिती
2 दहावी, बारावीच्या ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचं काम पूर्ण
3 करोना रुग्णांवर मोफत उपचाराची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला न्यायालयानं ठोठावला ५ लाखांचा दंड
Just Now!
X