प्रतापगडाच्या (ता. महाबळेश्वर) मुख्य ध्वज बुरुजाच्या डाव्या बाजूस असलेल्या तटबंदीच्या खालील काही भाग रविवारी ढासळला. यामुळे गडाच्या तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

महाबळेश्वरमध्ये आज अखेरपर्यंत १,४०५ मिमी (५५ इंच) पावसाची नोंद झाली आहे. प्रतापगड परिसरात महाबळेश्वर शहरापेक्षा अधिक पाऊस असतो. मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आणि डोंगर दऱ्या असल्यामुळे पावसाचे प्रमाण इथे जास्त असते.

आज (रविवारी) सकाळच्या सुमारास गडाच्या ध्वज बुरुजाच्या डाव्या बाजूस असलेल्या तटबंदीच्या खालील भाग कोसळल्याचे स्थानिक नागरिकांच्या नजरेस दिसून आले. प्रतापगडाची डागडुजी करण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी अठरा कोटी रुपयांचा प्राथमिक निधी मंजूर करून घेतला आहे. मात्र, याचे काम सुरु करण्यात विविध परवान्यांच्या अडचण येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे कमकुवत झाली असून त्याच्या दुरुस्तीची गरज आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच बुरुजाचे काम सुरू करण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.