महाराष्ट्रातल्या १६७१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये १७४ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर १४९७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन महाराष्ट्रात १८ पोलिसांचा मृत्यू जाला आहे. तर आत्तापर्यंत ५४१ पोलीस हे करोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी यासंदर्भातली माहिती दिली असून एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२१ मे रोजी ठाण्यात ४५ वर्षीय महिला पोलिसाचा करोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. तर पुण्यातही दोन पोलिसांच्या दोन मृत्यूची नोंद झाली होती. आता महाराष्ट्रात १६७१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. तर १८ पोलिसांचा आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. पोलिसांचा आणि डॉक्टरांचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायमच करोना योद्धे म्हणून केला आहे. तसंच आत्तापर्यंत जवळपास सगळ्याच राजकीय नेत्यांनी पोलिसांचे वारंवार आभार मानले आहेत. आपलं कर्तव्य बजावत असताना आत्तापर्यंत महाराष्ट्रात १६७१ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये १७४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.