08 March 2021

News Flash

कुण्याच्या जाण्याने काही संपत नाही-महाजन

भाजप हा व्यक्तिकेंद्रीत पक्ष नसून तो विचारावर चालणारा पक्ष आहे

(संग्रहित छायाचित्र)

पाठीत खंजीर खुपसण्याची आमची संस्कृती नाही. ज्यांची ती संस्कृती आहे; तेच तशी भाषा करतात. भाजप हा व्यक्तिकेंद्रीत पक्ष नसून तो विचारावर चालणारा पक्ष आहे. मी गेलो म्हणून संपले असे होत नाही. जाणारे जातात पण कुणाच्या जाण्याने काहीच संपत नाही, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना नामोल्लेख न करता लगावला

पाचोरा येथे भाजप कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी महाजन यांनी  महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. भाषणे देऊन आणि ऑनलाइन संवाद साधून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे. राज्यात पहिल्यांदाच निष्क्रीय  आणि बेजबाबदार सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणे घेणे नाही, अशी टीका महाजन यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:15 am

Web Title: there is no end to the well going girish mahajan abn 97
Next Stories
1 श्रीविठ्ठलाचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच दर्शन
2 आमदारांनी बाळासाहेबांची शिवसेना आठवावी
3 ५० कोटींचा निधी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरचे निराकरण नाही – नवाब मलिक
Just Now!
X