राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयाला सदिच्छा भेट देणार आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. मात्र मंगळवार संध्याकाळपासून या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. मागील तीन दिवसांमध्ये या प्रकरणावरुन बराच राजकीय वादंग झाला आहे. जाणून घेऊयात नक्की काय काय घडलं मागील तीन दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये…

२४ सप्टेंबर २०१९ (मंगळवार)

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?

ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याचे पहिले वृत्त समोर आले

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मागील तीन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात… पहिली प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली

गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन यावर आपला संताप व्यक्त केला होता. ट्विटवरुन जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवला होता. येथे वाचा सविस्तर वृत्त…

खुद्द शरद पवार यांनी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमार या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली

शिखर बँक घोटाळा प्रकरणात माझ्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. पाहिली प्रतिक्रिया देताना पवार नक्की काय म्हणाले होते जाणून घ्या येथे क्लिक करुन…

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपाला लगावला टोला

एक शेर ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावरुन भाजपावर निशाणा साधला होता. येथे क्लिक करुन जाणून घ्या काय म्हणाले होते धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी बारामती बंदची हाक दिली

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर येताच उद्या बारामती बंदचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपा सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असाही आरोप बारामतीकरांनी केला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

२५ सप्टेंबर २०१९ (बुधवार)

बारामती बंदची हाक दिल्याने अंजली दमानियांची शरद पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बारामतीत बुधवारी बंद पाळण्यात आला. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका येथे क्लिक करुन जाणून घ्या काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया

रोहित पवार यांची शरद पवारांच्या बाजूने बँटींग, सरकारवर केली टीका

शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबूकवरून ईडीच्या कारवाईवर टीका केली. क्रिकेटचे उदाहरण देत त्यांनी ही टीका केली. येथे वाचा सविस्तर वृत्त…

अजित पवार यांनी मांडली आपली बाजू

शिखर बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली बाजू मांडताना काही प्रश्न उपस्थित केले. येथे वाचा सविस्तर वृत्त…

शरद पवारांवर गुन्हा: पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

बुधवारी राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आली. या आंदोलनाचे पडसाद पुण्यात देखील उमटले. येथे क्लिक करुन जाणून घ्या बुधवारी नक्की पुण्यात काय काय घडले…

गुरुवारी परळी बंदची हाक

परळीच्या शिवाजी चौकात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. येथे क्लिक करुन जाणून घ्या नक्की राज्यात काय घडले बुधवारी…

ईडीने शरद पवारांवर केलेल्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

शिखर बँक घोटाळा प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर टीकेची झोड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून उठवली गेली. यावर अखेर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. येथे क्लिक करुन जाणून घ्या काय म्हणाले होते मुख्यमंत्री

शरद पवारांवर कारवाई का करण्यात आली, अजित पवारांचा सवाल

शिखर बँक प्रकरणात एका पैशाचाही भ्रष्टाचार झालाच नाही असा दावा अजित पवार यांनी केला. तसेच त्यांनी या प्रकरणात पवारांचे नाव गोवण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदवला. वाचा सविस्तर वृत्त..

शिखर बँक घोटाळ्याशी शरद पवारांचा संबंध काय?; अनेकांना पडला प्रश्न

या संपूर्ण प्रकरणाशी शरद पवार यांचा थेट काय संबंध आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. खुद्द शरद पवार, अजित पवार यांच्याबरोबरच हे प्रकरण उघडकीस आणणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात शरद पवारांचे नाव आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. येथे क्लिक करुन जाणून घ्या कोण काय म्हणाले आहे यासंदर्भात…

२६ सप्टेंबर २०१९ (गुरुवार)

भाजपाच्या ‘रम्या’ची पवारांवर टीका

भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून पवारांवर ट्विटवरुन टीका केली. येथे क्लिक करुन पाहा काय होते या व्यंगचित्रामध्ये


अण्णा हजारेंनी या प्रकरणात पहिल्यांदाच नोंदवले आपले मत, म्हणाले…

राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताने राज्यासह देशभरात खळबळ उडाली. मात्र, या घोटाळ्याचे पुरावे ज्यांनी सादर केले होते, त्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याप्रकरणी पहिल्यांदाच आपले मत नोंदवले. वाचा सविस्तर वृत्त..


शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाणार, पवारांनी केले ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची माहिती दिली. येथे क्लिक करुन जाणून घ्या काय म्हणाले पवार या ट्विटसमध्ये…


थोडं इतिहासात डोकावून पाहताना

शरद पवारांना जेव्हा अमरावतीत अटक झाली होती..

जाणून घ्या १९८० मध्ये नक्की काय घडले होते जेव्हा पवारांना अमरावतीमध्ये झाली होती अटक. येथे क्लिक करुन वाचा नक्की कोणत्या प्रकरणात झाली होती ही अटक


२७ सप्टेंबर २०१९ (शुक्रवार)

दक्षिण मुंबईतील काही परिसरात जमावबंदीचे आदेश

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील काही परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. येथे क्लिक करुन वाचा पवार ईडी कार्यालयाला भेट देणार आहेत त्यासंदर्भातील सर्व अपडेट्स

आव्हाडही ईडी कार्यालयावर धडकणार

राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपण ईडी कार्यालयावर येणार असल्याचं म्हटलं आहे. वाचा सविस्तर वृत्त..