मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या

१. दमदार पावसाचा अंदाज


मागील दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, सोमवारपासून कोकणापासून विदर्भापर्यंत दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

२. फ्लोरिडात रेस्तराँमध्ये अंदाधुंद गोळीबार; ४ ठार, ११ जण जखमी

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील जॅक्सनविल परिसरात रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४ ठार तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर..

३. मुस्लीम संघटनाही आरक्षणासाठी सरसावल्या

मराठा आणि धनगर समाजाच्या संघटनांनी आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनानंतर आता मुस्लीम समाजाच्या विविध संघटनाही आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे सरसावल्या आहेत. वाचा सविस्तर..

४. नेहरूंचे योगदान पुसण्याचा प्रयत्न करू नका!

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालय (एनएमएमएल) आणि तीन मूर्ती स्मारक यांच्यात केल्या जाणाऱ्या प्रस्तावित बदलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर..

५. आगामी निवडणुकीत भाजपेतर शक्तींनी एकत्र यावे – अमर्त्य सेन

देशात लोकशाही धोक्यात असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जातीयता विरोधी, भाजपेतर शक्तींनी एकत्र येऊन भाजपचा मुकाबला करावा. त्यात डाव्यांनीही सहभागी होण्यात कुचराई करू नये, असे मत नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले आहे. वाचा सविस्तर..