सुटीच्या कालावधीत पर्यटक मोठय़ा संख्येने कोकणात येतात . कोकणच्या) किनारपट्टीबरोबरच रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींची गर्दी लक्षणीय आहे . यंदाच्या उन्हाळी सुटीत जिल्ह्य़ात मोठय़ा  संख्ये ने आलेल्या पर्यटकांनी किल्ल रायगडला आवर्जून भेट दिली .

किल्ले रायगड, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. काळाच्या ओघात किल्याची दूरवस्था झाली असली तरी या किल्ल्याबाबतचं आकर्षण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे . त्यामुळंच इथं शिवप्रेमींबरोबरच पर्यटकांचीही रेलचेल पहायला मिळतेय . मे महिन्याच्या तळपत्या उन्हातही नागरीक मोठय़ा संख्येने रायगडावर येत आहेत .

मुघल स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या रायगडावर विविध मनोरे , धान्याचं कोठार, राणी महाल, राजदरबार , नगारखाना, होळीच्या  माळाला लागून असलेली लांबलचक बाजारपेठ, हिरकणी बुरूज ,जगदीश्वराचं मंदिर, गंगासागर तलाव , टकमक टोक, महाराजांची समाधी ही महत्वाची ठिकाणं, यातील बऱ्याच वास्तू, कालौघात जीर्ण किंवा नष्ट झाल्या असल्या तरी त्या आजही प्रेरणादायी ठरतात. त्यामुळे रायगडाचं आकर्षण आजही कायम आहे किंबहुना ते वाढत आहे .

 

रोपवेची सुविधा असल्याने पर्यटकांना अधिक कष्टय न घेता किल्यावर पोहोचता येते . पायी चालत येण्याबरोबरच किल्यावर रोपवेने  येण्याचा अनुभव वेगळाच आनंद देतो. मागील काही वर्षांपासून रायगडावर गाईडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .त्यामुळे  किल्ल्याची खडानखडा माहिती मिळतेच . शिवाय शिवप्रभुंचा

जाज्वल्य इतिहास डोळयासमोर उभा राहतो. स्थानिक व्यावसायिकांना यातून मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध  झाला आहे . किल्ल्याच्या  पायथ्याशी राहणाऱ्या नागरीकांनी पर्यटकांच्या निवासासाठी खोल्या तसेच न्याहरी , जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे . गडावर ठिकठिकाणी ताक, दही, थंड पेय विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत .

रायगड ही महाराष्ट्राची पुण्यभुमी आहे. रायगडच्या संवर्धन आणि विकासासाठी सरकारने ६०० कोटी रूपयांचा आराखडा तयार केला असून त्याच्या कामालाही सुरूवात झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर इथं येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल , यात शंकाच नाही.

‘ किल्ले. रायगडावर येण्याची बरेच दिवसांपासूनची इच्छा. होती ती पूर्ण झाली . महाराजांच्याा िहदवी स्वराज्याची राजधानी पाहून भारावलो . रायगड हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर महारांजाची प्रेरणा देणारे एक केंद्र आहे. प्रत्येकाने एकदा तरी रायगडला भेट द्यायलाच हवी .’

प्रमोद अहिरे , पर्यटक जळगाव</strong>

‘रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या हंगामात शनिवार रविवारी पर्यटकांची संख्या मोठी होती . वाढत्या पर्यटकांच्या सुविधेसाठी रोप वेच्या ट्रॉलींची संख्या वाढवण्यात आली आहे. तासाला १०० पर्यटक किल्ल्यावर रोपवेने जातात व तेवढेच खाली येतात . पर्यटकांना प्रतिक्षागृहाचीदेखील सोय करण्या त आली आहे . ’

–  उदयकुमार फोंडके , व्यवस्थापक रायगड रोपवे