06 April 2020

News Flash

आता तुरीची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने

डिसेंबर महिन्यात कर्नाटक प्रांतातील तूर लातूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जाते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

तूर प्रतििक्वटल १३ हजारांवरून ५ हजारांवर

सोयाबीन, मूग या शेतमालाची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने झाली. त्यानंतर गतवर्षी १३ हजार रुपये प्रतििक्वटल असणारा तुरीचा भाव घसरून तो आता ५ हजार रुपयांवर आला आहे. बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भावाने तुरीची खरेदी होईल, हा जाणकारांचा अंदाज खरा ठरला आहे.

डिसेंबर महिन्यात कर्नाटक प्रांतातील तूर लातूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जाते. सध्या दररोज सुमारे ३ हजार िक्वटल कर्नाटक तुरीची आवक आहे. पुढील महिन्यापासून लातूर परिसरातील तुरीची आवक सुरू होईल. कर्नाटकात तुरीचा भाव ४ हजार ८०० रुपये प्रतििक्वटल आहे. लातूर बाजारपेठेत सध्याचा भाव हा ५ हजार रुपये ते ५ हजार २०० असा आहे. सध्या तुरीची आवक कमी असल्यामुळे हा भाव असला, तरी जेव्हा स्थानिक शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येईल तेव्हा भावात घसरण होईल, असा अंदाज आहे. राज्य शासनाच्या हमीभावाने तूर खरेदी करण्याची केंद्रे सुरू झाली असली, तरी या केंद्रात विकलेल्या मालाचे पसे शेतकऱ्याला किमान दीड ते दोन महिन्यानंतर मिळतात. शेतकरी पशाची गरज लक्षात घेऊन आपल्या गरजेपोटी कमी दराने स्वखुशीने शेतमाल विकत असल्याचे लिहून देतो व खरेदीदार यातून स्वत:ची सुटका करून घेतात व सर्रासपणे हमीभावापेक्षा कमी भावाने मालाची विक्री होते. जगभर तुरीचा पेरा वाढला. भारतातील तूर डाळीची गरज लक्षात घेऊन विविध देशांनी भारताला तूर डाळ निर्यात करता यावी, यासाठीचे धोरण आखले व त्यातून कमी दराने भारतात तूर डाळ पाठवली जात आहे. याच वेळी स्थानिक शेतकऱ्यांनी तुरीचे भाव वाढल्यामुळे मोठय़ा प्रमाणात तुरीचा पेरा केला व सुदैवाने या वर्षी तुरीचे विक्रमी पीक येते आहे. पुरवठा अधिक व तुलनेने मागणी कमी या सूत्रामुळे तुरीचे भाव पडलेले आहेत.

तुरीच्या भावातील ही घसरण विक्रमी आहे. भावातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मात्र या वर्षी कंबरडे मोडणार आहे. उत्पादन अधिक झाले असले तरी प्रत्यक्षात मिळणारा पसा अतिशय कमी असल्यामुळे पिकले तरी अडचण, नाही पिकले तरी अडचण अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. सरकारने हमीभावाने खरेदी करणारी केंद्रे कार्यक्षमतेने कार्यान्वित केली, तरच कदाचित तुरीचा भाव स्थिर राहील अन्यथा हमीभावापेक्षा कमी भावाने तुरीची खरेदी सर्रास सुरू राहील. रब्बी हंगामातील हरभऱ्याचे उत्पादनही या वर्षी विक्रमी आहे. सध्या विदेशातील आणलेल्या हरभऱ्याला भाव प्रतििक्वटल ९ ते १० हजार रुपये आहे. स्थानिक शेतकऱ्याचा हरभरा जेव्हा बाजारपेठेत येईल, तेव्हा देखील हरभऱ्याच्या भावात घसरण होऊन तो  ५ हजार रुपयांपर्यंत उतरेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे.

शेतकरीहिताची भाषा विरोधी पक्षात असताना भाजपाने केली होती. सत्तेवर येऊन आता दोन वष्रे उलटून गेली असली, तरी शेतकऱ्यांचे हित साधले जात नाही याबद्दल शेतकरीवर्गात कमालीची नाराजी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2016 1:33 am

Web Title: tur dal purchasing issue
Next Stories
1 रायगडसाठी ४०० शेततळ्यांची निर्मिती होणार
2 मुस्लीम समाजाचे बीडमध्ये आरक्षणासाठी शक्तिप्रदर्शन
3 उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकांची निम्मी पदे रिक्त
Just Now!
X