04 June 2020

News Flash

‘त्या’ दोघा भावांनी बलात्कार, चित्रफीत तयार केल्याचे स्पष्ट

कडेगाव तालुक्यातील विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्या दोघा भावांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून ध्वनिचित्रफीत तयार केल्याची माहिती तपासात पुढे आली असून या दोघांना न्यायालयाने चार दिवस

| January 3, 2015 03:55 am

कडेगाव तालुक्यातील विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्या दोघा भावांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून ध्वनिचित्रफीत तयार केल्याची माहिती तपासात पुढे आली असून या दोघांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
आठ दिवसांपूर्वी किशोर मुळीक आणि मीनानाथ मुळीक या दोघा तरुणांना १२ जणांनी मुलीवर लंगिक अत्याचार केल्याबद्दल जाब विचारत असताना बेदम मारहाण करून गावातील चौकापर्यंत धिंड काढली होती. या दोघांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार कडेगाव पोलीस ठाण्यात दिली.
बलात्काराच्या आरोपावरून दोघा भावाना पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अत्याचारित मुलीचे अश्लिल चित्रीकरण केल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली असून अद्याप याप्रकरणी ठोस पुरावा पोलिसांच्या हाती आला नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2015 3:55 am

Web Title: two brother raped minor girl and create a video
टॅग Sangli
Next Stories
1 कोल्हापूर महापालिका स्थायी सभापतिपदी आदिल फरास
2 परराष्ट्र मंत्रालयाकडून ३२ लाख पासपोर्टसाठी नगरला अद्ययावत कक्ष
3 नगर शहरावर धुक्याची दाट चादर
Just Now!
X