जिल्ह्यात लॉकडाउननंतरही करोनाचा संसर्ग वाढतच आहे. आज शनिवारी जिल्ह्यात दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २९ वर पोहचली. आज निधन झालेल्या रूग्णांमध्ये यवतमाळ व दिग्रस येथील व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आज नव्याने ३९ रूग्णांची भर पडली तर ६५ रूग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

आज मृत्यू झालेला एक ६० वर्षीय पुरूष यवतमाळ शहरातील तेलीपुरा भागातील तर दुसरा ७० वर्षीय व्यक्ती दिग्रस शहरातील वार्ड क्र. एक मधील रहिवासी आहे. दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या ३९ जणांमध्ये १९ पुरुष व २० महिलांचा समावेश आहे.

यवतमाळ शहरातील कोहिनूर सोसायटी येथील एक पुरुष, नेहरू चौक येथील एक पुरुष, तेलीपुरा येथील एक पुरुष, प्रजापतीनगर येथील एक पुरुष व एक महिला, पिंपळगाव येथील एक पुरुष, गजानन नगर येथील एक महिला तसेच यवतमाळ शहरातील आणखी एक महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष तसेच पांढरकवडा शहरातील चार पुरुष व तीन महिला, पुसद शहरातील बारी नगर येथील एक पुरुष, पुसद शहरातील गोकूल नगर येथील दोन महिला, आर्णी शहरातील पाच पुरुष व नऊ महिला, महागाव शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील एक पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२५ इतकी आहे. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ११५ झाली आहे. यांपैकी ६६१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. विलगीकरण कक्षात सध्या १०२ संशयित व्यक्ती भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत १८ हजार सहा नमुने तपासणीसाठी पाठविले असून यांपैकी १४ हजार ७३० नमुन्यांचे अहवाल प्राप्त तर तीन हजार २७६ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच १३ हजार ६१५ नागरिकांचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे.