02 December 2020

News Flash

सेल्फीच्या नादात दोन तरूणांचा धरणात बुडून मृत्यू

इटियाडोह भागात घडली भागात

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत आंघोळीस उतरलेले जळगावचे चार युवक बुडाले. यातील तीन युवकांना वाचवण्यात यश आले पण एकाचा बुडून मृत्यू झाला.

प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी इटियाडोह धरण भागात दोन तरूण गेले होते. सेल्फी काढण्याच्या नादात या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला. २६ जानेवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी रामदास गोटफोडे आणि एजाज नईम शेख हे दोन तरूण या भागात फिरायला गेले होते. रामदास हा डिपरटोला कुरखेडा गडचिरोलीमध्ये राहणारा आहे. तर एजाज गांधी वॉर्ड, कुरखेडा या ठिकाणी राहतो. हे दोघेही आजच सकाळी इटियाडोह भागात आले होते. अकोला भागात ही घटना घडली आहे.

या ठिकाणी हे दोघे फिरायला आले होते. इटियाडोह भागात नयनरम्य धरण आहे. सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी नेहेमीच गर्दी असते. मात्र या ठिकाणी धरणात उतरून फोटो काढण्याचा मोह लोकांना आवरत नाही. अशाच प्रकारे हे दोघे तरूणही पाण्यात उतरले. पाण्यात उतरल्यावर या दोघांनाही सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. सेल्फीच्या नादात त्यांचा तोल गेला आणि ते बुडाले. या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ मित्र सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. मात्र या दोघांच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच खूप दुःख झाले. या प्रकरणी केशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 10:43 pm

Web Title: two young men drowned in the dam
Next Stories
1 खडतर तैलबैला सर करत नऊ मुलींनी तीन हजार फुटांवर फडकवला तिरंगा
2 Lunar eclipse 2018: बुधवारी आकाशात निळा नजराणा!
3 कीटकनाशक बळींची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न?
Just Now!
X