दिवा रेल्वे स्थानकाजवळ बंद फाटक ओलांडून जात असलेल्या दुचाकीला भरधाव एक्स्प्रेसने उडवल्याने झालेल्या अपघातात दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (सोमवार) ११ च्या सुमारास घडली.

दिवा रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेस जात असल्याने फाटक बंद होते. त्यावेळी अॅक्टिव्हावरून आलेल्या दोन तरूणांनी बंद फाटकातून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भरधाव एक्स्प्रेसने त्या दोघांना उडवले. दोघेही जागीच ठार झाले. दोन्ही युवक दिवा येथे राहणारे होते. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.