03 December 2020

News Flash

उदयनराजे यांना भाजपानं पुन्हा दिली संसदेत जाण्याची संधी, आठवलेंनाही लॉटरी

२६ मार्च रोजी होणार राज्यसभेसाठी निवडणूक

लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा संसदेची दारे खुणावू लागली आहेत. या महिन्याच्या अखेरीस राज्यसभा सदस्यत्वासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपाने उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत उदयनराजे भोसले यांचंही नाव आहे. या शिवाय भाजपानं महाराष्ट्रातून आरपीआय(ए)चे नेते रामदास आठवले यांनाही उमेदवारी दिली आहे.

२६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपानं बुधवारी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात मित्र पक्षांच्या दोन उमेदवारांसह एकूण ११ जणांची नावं आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचंही नाव त्यात आहे.

अशी आहे यादी
भाजपाने बुधवारी नऊ राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये असाम (भुवनेश्वर कालीता), बिहार (विवेक ठाकूर), गुजरात (अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा), झारखंड (दीपक प्रकाश), मणिपूर (लिएसेंबा महाराजा), मध्य प्रदेश (ज्योतिरादित्य शिंदे, हर्ष सिंह चौहान), महाराष्ट्रातून (उदयनराजे भोसले, रामदास आठवले), राजस्थान (राजेंद्र गहलोत) यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2020 6:54 pm

Web Title: udayanraje bhosale got chance to get rajyasabha seat from bjp pkd 81
टॅग Election
Next Stories
1 मध्य प्रदेशात घडेल चमत्कार; शरद पवार यांना विश्वास
2 ठाकरे सरकारबद्दल शरद पवारांनी वर्तवलं ‘हे’ भाकीत
3 “तपकीर ओढल्याने करोनाचा विषाणू मरू शकतो”; महाराष्ट्रातील भाजपा नेत्याचा दावा
Just Now!
X