स्कॉच या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे. ‘कोविडला प्रतिसाद’ या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कॉच अॅवॉर्ड वर्धा जिल्ह्याला मिळाला असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.

सर्वत्र करोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने सुरूवातीचे ५० दिवस करोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. शिवाय यासाठी विविध उपाय योजना केल्या. स्कॉच पुरस्काराच्या स्पर्धेत सहभागी झाल्यावर ऑनलाइन बैठकीत वर्धा जिल्ह्यात काय प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आले याची माहिती देण्यात आली. पहिली फेरी, दुसरी फेरी असे करीत वर्धा जिल्हा या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत पोहोचला. पीपीटीद्वारे अंतिम फेरीत उत्कृष्टपणे सादरीकरण केल्यानंतर वर्धा जिल्ह्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Loksatta Lokrang Maharashtra Foundation is recognized in Maharashtra for awards in literary and social fields
पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !
Split in 'India' alliance in Gadchiroli, peasants and workers party of india
गडचिरोलीत ‘इंडिया’ आघाडीत फूट, शेकाप नेत्याचे गंभीर आरोप; दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

नवीन सोना यांच्या कार्यकाळातही मिळाला होता बहुमान

जिल्हाधिकारी नवीन सोना यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला स्कॉच अॅवॉर्ड प्राप्त झाला होता. त्यावेळी डीबीटी प्रणालीत उत्कृष्ट काम केल्यामुळे वर्धा जिल्ह्याला हा बहुमान प्राप्त झाला होता. तर आता जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

हा पुरस्कार जिल्ह्यातील सर्व नागरिक, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ग्रामविकास आणि नगरविकास, जिल्हा परिषद आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या परिश्रमाचे फळ आहे. आतापर्यंत जिल्ह्याने उत्कृष्ट काम करून करोनाचा संसर्ग कमी ठेवण्यासाठी काम केले. यापुढेही जिल्ह्यात करोना विषाणूमुळे एकही मृत्यू होणार नाही यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही साथ द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.