युनियन बँकेचे कामकाज संकेतस्थळ बंद पडल्याने सलग आठ दिवसापासून बंद असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी होत आहे. आंध्र बँकेचे विलिनीकरण युनियन बँकेत झाल्यानंतर दोन्ही बँकांचे खातेदार चांगल्याच अडचणीत आल्याचे चित्र आहे. २४ जूनपासून ते आजतागायत संकेतस्थळ बंद असल्याने खातेदारांचे व्यवहार ठप्प पडले आहे.

शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना वेळोवेळी पैशांची गरज पडते. त्यासाठी ते युनियन बँकेकडे चकरा मारत आहेत. हा प्रश्न रिपाईचे नेते अशोक मेश्राम यांनी बँक व्यवस्थापकाकडे उपस्थित केला? त्यावेळी परिसरात केबलचे खोदकाम सुरू असल्याने लिंक ठप्प पडल्याचे उत्तर मिळाले. ही तांत्रिक त्रूटी दूर करण्याची जबाबदारी बँकेची आहे. मात्र व्यवस्थापनाने यावर हतबलता व्यक्त केल्यानंतर बंद पडलेल्या व्यवहाराबाबत बँकेच्या व्यवस्थापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मेश्राम यांनी केली आहे.

महिला बचतगटाचे अनेक खाती या बँकेत आहे. परंतू व्यवहार होत नसल्याने हे गट अडचणीत आले आहेत. गटांना ठरावीक काळात कर्जाचा हप्ता भरावा लागतो. बँकेत जमा पैशातून व्यवहार होतात. पण सलग सात दिवसांपासून व्यवहार होत नसल्याने बचतगटाच्या महिलांची कोंडी होत आहे. सर्व सामान्य लोकांना त्यांच्या हक्काच्या पैशांपासून बँक कशी काय वंचित ठेवू शकते? असा प्रश्ना उपस्थित केल्या जातो. ऑनलाईन व्यवहार पुढे कधी सुरू होतील, याबाबत स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली.