News Flash

चंद्रपुरातील युवकांची १०५ किलोमीटर अंतरावरील नागभीड केंद्रात नोंदणी

लसीच्या दुसऱ्या डोजच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांनी नोंदणी केली.

(संग्रहित छायाचित्र)

लसीकरणाचा गोंधळ

चंद्रपूर : जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र चंद्रपूर शहरापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नागभीड येथील केंद्रासह जवळच्या बल्लारपूर, राजुरा व ब्रम्हपुरी येथील लसीकरण केंद्रात अनेकांची नोंदणी झाल्याने बहुसंख्य लोकांचा एकच गोंधळ उडाला. त्याचा परिणाम ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर देखील अनेकांनी लस घेतली नाही. तर लसीच्या दुसऱ्या डोजच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांनी नोंदणी केली. मात्र केंद्रावर प्रथम पोहचलेल्यांना टोकन वितरित केल्याने अनेकांना नोंदणी नंतरही लस न घेताच परतावे लागले.

जिल्ह्यात १८ ते ४४ वय गटासाठी एकूण ७ लसीकरण केंद्र आहेत. यामध्ये प्राथमिक शाळा, पोलीस स्टेशन समोर, ब्रम्हपुरी, रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर, चंद्रपूर, पंजाबी सेवा समिती, तुकूम, चंद्रपूर, नाटय़ सभागृह, बल्लारपूर, समाज मंदिर रामनगर राजुरा, बुद्ध लेणी विजासन भद्रावती, जनता कन्या विद्यालय, नागभीड या केंद्राचा समावेश आहे. ऑनलाईन नोंदणी करताना बहुसंख्य लोकांचा समज जनता कन्या हायस्कूल ही शाळा चंद्रपूर शहरात असल्याचा समज झाला. त्यामुळे बहुसंख्य लोकांनी या शाळेचे केंद्रावर नोंदणी केली. प्रत्यक्षात ही शाळा चंद्रपूरपासून १०५ किलोमीटर अंतरावर नागभीड येथे आहे. ज्यांना ही शाळा नागभीड येथे आहे याची कल्पना नव्हती ते सकाळी ९ वाजता पासून चंद्रपूर शहरात ही शाळा शोधत फिरत होते. ही शाळा नागभीडमध्ये आहे हे लक्षात आले तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला. अनेकांना बल्लारपूर शहर, राजुरा, भद्रावती व १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रम्हपुरी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी झाली. त्याचा परिणाम अनेकांनी आज लस घेतलीच नाही. दुसऱ्या डोज साठी देखील असाच गोंधळ उडाला. आज अनेक केंद्रावर १०० जणांची नोंदणी केली गेली. नोंदणी नंतरही ज्यांनी सकाळी केंद्रावर लाईन लावली त्यांना टोकन वितरित केले गेले. त्यांनाच लस दिली गेली. नोंदणी केल्यानंतर ही केंद्रावर उशिरा पोहचलेल्या, ज्यांना टोकन मिळाले नाही अशांना लस न घेताच परत यावे लागले. अशा प्रकारचा गोंधळ जिल्हय़ात सर्वचकेंद्रावर बघायला मिळाला.

* महापालिकेने शहरात आरटीपीसीआर तथा अ‍ॅन्टिजन करोना चाचणी केंद्र सुरू केले. मात्र बहुतांश केंद्रावर चाचणी किट संपल्याने चाचणी केंद्र बंद पडली आहेत. त्याचा परिणाम लोकांना आल्या पावली चाचणी न करताच परत जावे लागत आहे.

* गडचिरोली जिल्हय़ातील देसाईगंज नगर परिषदेच्या हद्दीतील डॉ. मनोज बुद्धे व डॉ श्रीकांत बनसोड या दोन्ही रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्ण मिळाल्याने दोन्ही रुग्णालय सील करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 1:18 am

Web Title: youth from chandrapur register for vaccination at nagbhid center zws 70
Next Stories
1 वैद्यकीयच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची करोना रुग्णासाठी सेवा घेण्याचा विचार
2 प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गात जागेचा अडसर
3 दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : एम.एस. रेड्डीला न्यायालयीन कोठडी
Just Now!
X