24 October 2019

News Flash

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरेंचाच!

ईव्हीएम पद्धतीवर राज ठाकरेंचा विश्वास नाही असंही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणूक मनसेने लढवायची की नाही? यावर आमची चर्चा झाली होती. राज ठाकरे यांच्याशी आम्ही चर्चा केली होती. मनसेने निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्ही जी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली आहे त्यांनी आम्हाला निवडणूक लढवावी असं म्हटलं आहे. आता पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना हा सगळा अहवाल दिला जाईल. आता काय निर्णय जाहीर घ्यायचा हे पक्ष प्रमुख राज ठाकरेच योग्य वेळी जाहीर करतील. निवडणूक लढवायची की नाही याचा अंतिम निर्णय राज ठाकरेच घेणार अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

निवडणूक लढवण्याच्या बाजूने आमचा कल आहे. आमची याआधीची चर्चाही सकारात्मक झाली होती. मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करण्यात आली. राज ठाकरे ईव्हीएमबाबत साशंक आहेत. ही निवडणूक ईव्हीएमवरच घेतली जाणार आहे. दरम्यान पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही सगळेच निवडणूक लढण्याच्या बाजूने आहोत मात्र आमचं म्हणणं ऐकून घेऊन, आमचा अहवाल पाहून राज ठाकरे काय ते ठरवतील. अमित ठाकरे हेदेखील या प्रक्रियेत सहभागी असतात. त्यांचंही मत विचारात घेतली जाईल आणि याबाबतचा अहवाल आम्ही राज ठाकरेंना देणार आहोत. राज ठाकरे याबाबतचा निर्णय जाहीर करतील असं बाळा नांदगवाकर यांनी स्पष्ट केलं.

 

 

First Published on September 20, 2019 5:35 pm

Web Title: raj thackeray will decide to contest assembly polls or not say bala nandgaonkar scj 81