राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. अशातच हिंदुत्त्ववादी विचारांची शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांसोबत कसे जुळवून घेईल, असा प्रश्न सातत्त्यानं उपस्थित केला जात होता. यावर संजय राऊत यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. “आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर या संकल्पनेवर आधारित आहे. कोणालाही मदत करताना जात धर्म पंथ पाहून मदत केली जात नाही. आम्ही देशाच्या घटनेचा आदर करतो,” असं राऊत यावेळी म्हणाले.

“आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर या संकल्पनेवर आधारित आहे. कोणालाही मदत करताना जात धर्म पंथ पाहून मदत केली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील सर्व धर्मियांना एकत्र घेऊन राज्य स्थापन केलं होतं. आम्ही देशाच्या घटनेचा आदर करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेबर हे देशातील एकमेव असे नेते आहेत ज्यांनी न्यायालयात कुराण, भगवतगीतेवर हात ठेवून शपथ घेण्याऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितलं होतं,” असंही राऊत म्हणाले. तसंच यामुळे सेक्युलर या शब्दावर अधिक बोलण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले.

rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..

मुख्यमंत्रिपदाबाबत काही ठरलं नाही
“मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबद्दल अद्याप काहीही ठरलेलं नाही. तसंच आघाडीत पक्षांनी तशी कोणती मागणीही केली नाही. याबाबत विनाकारण गोंधळ उडवू नये. जो काही निर्णय होईल, ते सर्वांच्या समोर येईल, असं राऊत यावेळी म्हणाले. दिल्लीतील काम आता संपलं आहे. पुढील सर्व चर्चा या मुंबईतच होतील. तिन्ही पक्षांची संयुक्त बैठकही मुंबईतच होईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.