03 March 2021

News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले पंकजा मुंडेंचे आभार, राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या टि्वटला प्रतिसाद दिला असून त्यांचे आभार मानले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या टि्वटला प्रतिसाद दिला असून त्यांचे आभार मानले आहेत. तीन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी टि्वट करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. ‘राज्याचे हित प्रथम’ ही महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा असल्याचे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांचा आभार मानताना ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असे आपल्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे.

पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंचे आभार मानणार टि्वट केले आहे. पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. यानंतर पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरुन आपली भाजपासंदर्भातली ओळखही काढून टाकली. त्यामुळे पंकजा भाजपाला रामराम करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं.

या सर्व विषयावर भाजपाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “पंकजा मुंडे या भाजपाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांचं पंकजा मुंडेंशी बोलणं झालं असून, त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात”, असे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महिला-बाल कल्याण आणि ग्रामविकास खात्याचा पदभार सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी यावेळी बाजी मारत विधानसभेमध्ये आपलं स्थान पक्क केलं. हक्काच्या परळी मतदारसंघातून झालेला पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 6:30 pm

Web Title: uddhav thackeray replyed to pankaja munde on her tweet dmp 82
Next Stories
1 सोनई ऑनर किलिंग : पाच जणांची फाशी उच्च न्यायालयाकडून कायम
2 “पंकजा मुंडे यांची ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक आहे, पण..”
3 नक्षलवाद्यांनी केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह पोलीस पाटलाची हत्या
Just Now!
X