26 September 2020

News Flash

विधानसभा निवडणुकीत मनसेसोबत जाणार नाही – प्रकाश आंबेडकर

त्यांनी एमआयएमबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रकाश आंबेडकर (संग्रहित छायाचित्र)

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसेला सोबत घेणार नाही. तसंच या निवडणुकांसाठी मुस्लीम समाजाचे 25 उमेदवार देणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. यापूर्वीही त्यांनी आपली मनसेसोबतची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही राष्ट्रवादी आहोत. तसंच आम्ही मनसेसोबत जाणार नाही. आमचा दृष्टीकोन प्रादेशिकही नाही आणि धार्मिकही नसल्याचे ते म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये काडीमोड झाला होता. त्यानंतर एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली होती. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यावर बोलताना “एमआयएमचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत. त्यांनीच ते बंद केले. त्याची चावीही एमआयएमकडेच आहेत,”असे आंबेडकर म्हणाले.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे 98 जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान 74 जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 12:53 pm

Web Title: vanchit bahujan aghadi prakash ambedkar clarifies wont take mns with them maharashtra election jud 87
Next Stories
1 लोक सोडून जातील म्हणून पवारांकडून उमेदवारांची घोषणा; पंकजा मुंडेंची टीका
2 महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, भाजपा आमदारासह शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल
3 भाजपाकडून शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न; धनंजय मुंडे यांचा आरोप
Just Now!
X