विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातल्या खटाव तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक २५० नवलेवाडी  येथे हा प्रकार घडला. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटण दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत दिल्याचे दिसत होते. ग्रामस्थांच्या हा प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When voter casting vote for ncp it had go to bjp candidate aau
First published on: 22-10-2019 at 11:53 IST