सावंतवाडी: हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला असून कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रामध्ये निर्माण झाले आहे. वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने गुजरात येथील सुमारे १०० मच्छीमारी नौका सुरक्षेच्या दृष्टीने देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा: Maharashtra Bandh : मोठी बातमी! मविआचा उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे; शरद पवार, नाना पटोलेंनंतर उद्धव ठाकरेंकडूही भूमिका स्पष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रादेशिक हवामान विभागाच्या संदेशा नुसार दि. २३ ते २७ऑगस्ट या कालावधीत समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे ताशी सुमारे ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून या वाऱ्यांचा वेग ताशी ६५ किलोमीटर होण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारी नौका, यांत्रिक नौका छोटे मच्छीमार यांनी समुद्रात जावू नये तसेच सुरक्षित ठिकाणी आपल्या नौका नांगरून ठेवाव्यात. असे आवाहनही मत्स्यव्यवसाय खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.