सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे अपघात आणि इतर जीवित हानी रोखण्यासासाठी संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कुंपणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दौंड ते वाडी दरम्यान रेल्वेमार्गावर अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणे निश्चित करून तेथे सुमारे १५ किलोमीटर अंतराचे सुरक्षा कुंपण उभारण्यात आले आहे. याच रेल्वेमार्गावर अक्कलकोट भागातील अतिसंवेदनशील असणाऱ्या बोरोटी ते दुधनी दरम्यान सर्वात लांब २.४ किलोमीटर इतके तारेचे कुंपण उभारण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकामुळे कॉ. पानसरे यांची हत्या, कुटुंबियांचा उच्च न्यायालयात दावा

Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य
South East Central Railway Invites Applications To Fill Over 700 Apprentice Positions
Job Alert: रेल्वे विभागात बंपर भरती; दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज
12 Holi Special Trains of Central Railway
मुंबई : मध्य रेल्वेच्या बारा होळी विशेष गाड्या

हेही वाचा – जरांगे-पाटील यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

संवेदनशील असणाऱ्या बाळे-सोलापूर आणि बोरीवेल-मलठण अशा दोन ठिकाणी ४०० मीटर इतक्या सुरक्षा कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. या संरक्षक कुंपणामुळे रेल्वे गाड्यांचा वेग हा प्रतितास १३० किलोमीटरपर्यंत वाढू शकणार आहे. यातून सुरक्षितताही जपण्यास मदत होणार आहे. मागील वर्षभरात सोलापूर विभागातील रेल्वेमार्गावर सुमारे शंभरपेक्षा जास्त जनावरे रेल्वेगाड्यांखाली चिरडली गेली होती. त्याचा विचार करता स्थानिक शेतकरी आणि गोपालकांनी आपली जनावरे रेल्वेरूळाजवळ आणू नयेत. अन्यथा रेल्वे सुरक्षा बलाकडून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.