कोल्हापूर-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आडूरनजीक एसटीच्या चालकाचा ताबा सुटून सोमवारी झालेल्या अपघातात चालकासह तिघे जण जागीच ठार झाले, तर २० जण जखमी झाले. घटनेनंतर जखमींना तत्काळ उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली.
अपघातामध्ये चालक मेलवीन गोपी फर्नाडिस (वय ४०, रा. सिलवोल, ता. बारदेस गोवा), निवृत्त विस्तार अधिकारी नामदेव विठोबा बोडके (वय ६५, रा. आचरणे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग), मारुती लक्ष्मण निम्मलवार (वय ३५, रा. डिगलूर, जि. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत. तर देवगडचे नायब तहसीलदार नरेंद्र आनंदराव माने (वय २८ कोल्हापूर), वाहक रामनाथ दत्तू शेठ (वय ४२, डेळे, ता. कानकोंडा गोवा), एम. जी. खानकर (वय ५३, रा. कळंबा, कोल्हापूर), अमर वळवी (वय ४५, रा. फुलेवाडी, कोल्हापूर), नीलेश प्रभाकर भरके (वय ३०, रा. कोल्हापूर), अशोक यशवंत बन्ने (वय ५३, रा. कावळा नाका, कोल्हापूर), विलास शंकर मगदूम (वय ५५, रा. कसबा बावडा, कोल्हापूर), राजाराम कातरे (रा. भुईबावडा), मयूर नंदीकर (वय ३५, रा. सोळांकूर, ता. राधानगरी), डॉ. संदीप मंगरुळे (वय ३८, कोल्हापूर), कृष्णात कृलकर्णी (वय २३), मनोहर कुलकर्णी (वय २७, रा. बीड, ता. परळी), सचिन भिकाजी देशमुख (वय ४५, रा. कोल्हापूर), जयश्री बाळासाहेब देवकुळे (वय २६, रा. कळंबा कोल्हापूर), महेश सुरेश आनंदे (वय ३८, कोल्हापूर), सुदेश दादू िशदे (वय ३८, वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग), संजय कोरे (वय ४५, रा. जयसिंगपूर), डॉ. महंमदखान गवस (वय ३०, रा. गगनबावाडा), अमोल बाळासाहेब पोवार (वय ३८, रा. सानेगुरुजी कोल्हापूर) हे जखमी झाले आहेत. जखमींवर सीपीआर व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी सकाळी ५.३० वा. कोल्हापूर-पणजी एस.टी (जीए ०३ एक्स-०२३३) पणजीकडे निघाली होती. या वेळी बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. ६.०५ वाजता एस. टी. कुडित्रे साखर कारखान्यानजीक आली. ओढय़ापुढील असणाऱ्या वळणावर गाडीची मागील बाजू घसरली आणि ती रस्त्याकडेच्या झाडावर जोरात आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये चालक मेलवीन फर्नाडिस, नामदेव बोडके, मारुती निम्मलवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आडूर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी पाठवण्यात येत होते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jun 2014 रोजी प्रकाशित
एसटी अपघातात ३ ठार, २० जखमी
कोल्हापूर-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आडूरनजीक एसटीच्या चालकाचा ताबा सुटून सोमवारी झालेल्या अपघातात चालकासह तिघे जण जागीच ठार झाले, तर २० जण जखमी झाले.
First published on: 16-06-2014 at 02:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 killed 0 injured in st accident