लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : मिरजेतील शास्त्री चौकात मद्यधुंद वाहन चालकाने रस्त्याकडेला असलेल्या ठोकरल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले असून यामध्ये एका तरूणीचाही समावेश आहे. जखमींना मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हजार वाडी (ता. पलूस) येथील इंडियन ऑईल कंपनीच्या आगारात घरगुती इंधन टाक्या घेउन आयशर ट्रक निघाला होता. मिरज म्हैसाळ रस्त्यावरील शास्त्री चौक येथे असलेल्या दुचाकी दुरूस्तीच्या गॅरजेसमोर काही नागरिक उभे होते. याचवेळी म्हैसाळकडे इंधन टाक्या घेउन आलेल्या आयशर ट्रकने वाहनांना ठोकरतच पुढे जाण्याचा प्रयत्न चालवला होता. ट्रकच्या चाकाखाली एकजण सापडला तर पाच दुचाकीही चाकाखाली अडकल्याने ट्रक थांबला. यामध्ये इकबाल मणेर, अकिल मोमीन या दोघासह अलिशा मुल्ला ही तरूणी असे तिघे जखमी झाले. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. मद्याच्या अंमलाखाली असल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. नागरिकांनी चालकाला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले असून पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले.