शालेय विद्यार्थ्यांच्या खासगी मिनी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाच्या ट्रकने जबर धडक दिल्याने या बसमधील ४ विद्यार्थी जागीच ठार झाले, तर बसचालकासह ८ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना वणीजवळील सेलिब्रिटी गार्डन हॉटेलजवळ गुरुवारी घडली. ठार झालेल्यांमध्ये गौरव देशमुख, श्रद्धा उईके, निशा काकडे आणि श्रेया उलेमुले या विद्यार्थ्यांचा समावेश असून ते १२ ते १४ वर्षे वयोगटातील आहेत.
मायक्रॉन इंग्लिश मीडियम स्कूलचे १२ विद्यार्थी खासगी बसने नेहमीप्रमाणे शाळेला जात होते. त्यांची सकाळची शाळा असते, पण शाळेत पोहोचण्यापूर्वीच विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकने बसला जबर धडक दिली. या जबर धडकेने बारापैकी ४ विद्यार्थी जागीच ठार झाले, तर ८ विद्यार्थी आणि चालक जखमी झाले.
घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी हाहाकार उडाला. जखमींना तातडीने नागपूर आणि वणी येथे लोकांनी उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, संतप्त लोकांचा जमाव लक्षात घेऊन वणी, मारेगाव, करंजी इत्यादी ठिकाणाहून पोलीस कुमक बोलावण्यात आली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. वणीचे ठाणेदार कुळकर्णी यांनी ट्रकचालकाला अटक करून ट्रक ताब्यात घेतला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 killed in bus accident
First published on: 19-02-2016 at 01:02 IST