नाशिकमध्ये झालेल्या अपघातात पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुंबई-आग्रा महामार्गाजवळ कोकण फाट्याजवळ हा अपघात झाला.
नाशिकहून पिंपळगावला जाणाऱ्या टवेरा गाडीला टेम्पोची धडक बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हे पाचही डॉक्टर पिंपळगाव येथे राहणारे होते. डॉ. संजय तिवारी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. शेळके, डॉ. चद्रशेखर गांगुर्डे आणि डॉ. कुंदन जाधव अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांची नावे असून, डॉ. उमेश भोसले अपघातात जखमी झालेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 doctors killed in car accident
First published on: 18-05-2015 at 08:29 IST