भरधाव बसने रुग्णवाहिकेला जोरदार टक्कर दिल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी रात्री नागपूरपासून ६० किलोमीटरवर असलेल्या कोंडघाली गावाजवळ हा अपघात झाला. रुग्णवाहिकेतून सहा जण भुसावळहून अमरावतीमार्गे नागपूरला निघाले होते. मध्यरात्री नागपूरहून येणाऱया खासगी बसने रुग्णवाहिकेला समोरसमोर जोरदार धडक दिली. त्यामध्ये रुग्णवाहिकेतील सर्वजण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना नागपूरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांनी बसचालकाला अटक केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(संग्रहित छायाचित्र)
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
नागपूरजवळ भरधाव बसची रुग्णवाहिकेला धडक; सहा जणांच मृत्यू
भरधाव बसने रुग्णवाहिकेला जोरदार टक्कर दिल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.
First published on: 28-01-2014 at 02:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 killed 2 injured as bus hits ambulance