मुंबई : बाह्ययंत्रणेकडून कामगार भरती करण्याचा निर्णय लागू केल्यापासून ते आजतागायत एकूण १२०६ जणांची भरती करण्याचा निर्णय करण्यात आला असून त्यातील ८०४ जणांची प्रत्यक्षात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आल्याची माहिती कामगार विभागाचे आयुक्त सतीश देशमुख यांनी दिली. बाह्ययंत्रणेद्वारे शासनाच्या विविध विभागात भरती करण्याचा सुधारित निर्णय ६ सप्टेंबर २०२३ रोजी झाला.

हेही वाचा >>> “…म्हणून आम्ही कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला”; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

या निर्णयानुसार कोणत्या विभागात किती भरती झाली. याची शासकीय नोंद ठेवण्यासाठी कामगार विभागाने कामगार आयुक्त कार्यालयात ‘ऑनलाइन पोर्टल’ सुरू केले. यानुसार हा शासन निर्णय रद्द होईपर्यंत एकूण १२०६ जागांच्या भरतीस मान्यता देण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यातील ८०४ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बाह्ययंत्रणेद्वारे भरती करण्याचा शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. हा निर्णय झाल्यापासून याची अंमलबजावणी  मंद गतीने झाली, असे कामगार आयोगाचे म्हणणे आहे. बाह्ययंत्रणेद्वारे भरती करण्याचा सर्वप्रथम विचार २७ सप्टेंबर २०१० मध्ये काढलेल्या शासन निर्णयात झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.