लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात आणखी २१ नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १८४९ झाली. दरम्यान, आज ६९ कैद्याांसह ८१ जणांची करोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात करोनाचा प्रकोप सुरूच असून, रुग्ण संख्या वाढीचा वेग कायम आहे. सुदैवाने आजही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण २३० तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २०९ अहवाल नकारात्मक, तर २१ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण १३९१६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १३४७६, फेरतपासणीचे १५७ तर वैद्याकीय कर्मचाऱ्यांचे २८३ नमुने होते. आजपर्यंत एकूण १३७६५ अहवाल प्राप्त झाले आहेत.

एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ११९३७ तर सकारात्मक अहवाल रॅपिट टेस्टचे २१ मिळून १८४९ आहेत. आज दिवसभरात ८१ जणांना सुट्टी देण्यात आली. पीकेव्ही कोविड केअर सेंटरमधून पाच, सर्वोपचार रुग्णालयातून सात जणांना सोडण्यात आले. जिल्हा कारागृहातील कोविड केअर सेंटर मधील ६९ जण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांची कारागृहातच स्वतंत्र व्यवस्था व देखभाल केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४५० रुग्णांनी करोनावर विजय मिळवला.

आज दिवसभरात २१ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी प्राप्त अहवालात १३ जण बाधित आढळून आले. त्यात सहा महिला व सात पुरुष आहेत. त्यामध्ये अकोट, बाळापूर प्रत्येकी तीन, बार्शिटाकळी, कृषीनगर प्रत्येकी दोन तर तारफैल, कावसा ता.अकोट व पातूर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी आणखी आठ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात एक महिला व सात पुरुष आहेत. त्यामध्ये कंवरनगर येथील चार जण, तर बाळापूर, बोरगाव, सिंधी कॅम्प व मोठी उमरी येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: corona patients cure from corona in akola scj
First published on: 10-07-2020 at 21:59 IST