९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये बडोदा येथे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी झाली. अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा ७० मतांनी पराभव केला. पंचरंगी लढतीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर शोभणे यांना ३५७ मते मिळाली आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल देशमुख यांच्यावर साहित्यक्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 91th akhil bhartiya marathi sahitya sammelan president election laxmikant deshmukh
First published on: 10-12-2017 at 14:28 IST