सध्य सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे आपण कधीही न पाहिलेले असे आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शिवाय यामध्ये काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपणाला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. त्यामध्ये कधी वाघाला पाणघोड्याने पळवल्याच्या घटनेचा, तर कधी बिबट्याला कुत्र्यांनी घेरल्याच्या व्हिडीओचा समावेश असतो. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ आपण यापुर्वी पाहिले आहेत.

पण या सर्वांपेक्षा वेगळा आणि आश्चर्यकारक असा मांजरीचा आणि मगरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही. हो कारण मगर ही पाण्यात राहणाऱ्या सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरीला पाण्यातील शक्तिशाली आणि प्राणघातक प्राणी म्हटलं जातं. कारण ती पाण्यात हत्तीसारख्या ताकदवान प्राण्यांलाही पराभूत करते. शिवाय तिच्या आसपास फिरकणाऱ्या प्राण्याला ती शक्तिशाली जबड्यात अडकवून मारुन टाकते, मग ती पाण्यात असो वा पाण्याबाहेर मगर ही धोकादायकच असते. याबाबतची अनेक उदाहरण आपण सोशल मीडियावर या आधीही पाहिली आहेत.

हेही पाहा- Video: उंच डोंगरावरुन गवताच्या पेंड्या क्षणात पोहोचवल्या घरात; शेतकऱ्यांचा जुगाड पाहून तुम्हीही कौतुक कराल

हेही पाहा- १० कोटी वर्षांपूर्वी कशी दिसायची पृथ्वी, कसे निर्माण झाले पर्वत आणि समुद्र? पाहा थक्क करणारा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मगरीच्या जबड्यातील शिकार चक्क मांजरीने पळवून नेली आहे. कदाचित या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. jeck_roster नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका मगरीने काहीतरी शिकार केल्याचं दिसत आहे. मगर शांतपणे आपला जबडा उघडून बसलेली असताना अचानक तिथे एक मांजर येते आणि मगरीच्या जबड्यात तोंड घालून तिने केलेली शिकार पळवते. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मांजराच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर मांजर हा प्राणी जन्मताच खूप हूशार असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. अनेकांनी मांजरीला असं मगरीसमोर सोडणं धोकादायक असल्याचंही म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने ‘मृत्यूच्या दाढेतून परत येणं कशाला म्हणतात, ते यालाच’ अशी कमेंट केली आहे.