कराड : दारु पिऊन मारहाण करुन घराबाहेर काढणाऱ्या मुलाच्या डोक्यात बापाने लाकडी काठीने मारहाण करून त्याचा खून केला.पोलिसांची माहिती अशी, की शरद प्रतापराव मोहिते (वय ४२, रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर प्रतापराव गुलाबराव मोहिते (वय ७४, रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या वडिलांचे नाव आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी सचिन विलास मोहिते यांनी कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. प्रतापराव हे रेठरे बुद्रुक येथे पत्नी कमल व मुलगा शरद याचेसह राहत होते. शरदला दारुचे व्यसन होते. दारूसाठी त्याने घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, दूरदर्शन संच विकून टाकले होते. दारु पिल्यानंतर तो वडील प्रतापराव व आई कमल यांना सतत मारहाण व भांडण करून घराबाहेर काढत होता.

हेही वाचा >>>उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारीही शरदने दारूच्या नशेत वडील प्रतापराव यांना मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर पुन्हा शरद हा प्रतापराव यांना मारण्याच्या उद्देशाने अंगावरती गेला. त्यावेळी रागाच्या भरात प्रतापराव यांनी तेथे पडलेल्या काठीने मुलगा शरदच्या डोक्यात मारले. घाव वर्मी लागल्याने शरदच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर फिर्यादी सचिन मोहिते यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने शरदला रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.