सोलापूर : माढा तालुक्यातील कुर्डूवाडीनजीक कव्हे येथे स्वतःच्या चिमुकल्या मुलाचा कुऱ्हाडीने निर्घृणपणे खून करून स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या विवाहितेच्या कृत्याचा उलगडा महिन्यानंतर झाला आहे. आपले लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण सासरच्या मंडळींना कधी ना कधी समजेल, या भीतीपोटी त्या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.

हेही वाचा – सोलापूर : माढ्यात भाजपचा उमेदवार बदलण्यासाठी शिवसेनेचाही दबाव

हेही वाचा – साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

हेही वाचा – राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

कौशल्या ऊर्फ कोमल चोपडे या निष्ठुर आईनेच स्वत:चा पोटचा मुलगा प्रणव गणेश चोपडे (वय ६) याचे शरीर कुऱ्हाडीने छाटून दोन तुकडे करून निर्घृण खून केला आणि नंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. कोमल ही रुग्णालयात उपचारानंतर अखेर शुद्धीवर आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोमल ही आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याचा अभिप्राय दिल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अटक केली. तिने गुन्ह्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी प्रथम सतत टीव्ही पाहतो काय म्हणून मुलगा प्रणव याचा गळा आवळला. नंतर तो मेला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला हलवून पाहिले. परंतु आपण आत्महत्या केल्यानंतर मुलगा नाहीच मेला तर, असा विचार करून तिने कुऱ्हाडीने त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले. लग्नापूर्वीचे आपले प्रेमप्रकरण सासरी आज ना उद्या कधी तरी समजणार, या भीतीपोटी कोमल हिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.