पिंपरी-चिंचवड: आर्थिक व्यवहारातून एकाची हत्या करण्यात आली. ज्ञानेश्वर बर्गे अशी हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे. ही घटना आज पहाटे तीन च्या सुमारास घडली आहे. धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद अशी आरोपींची नाव आहेत.

सविस्तर माहिती अशी, मोशी येथील ग्रँड हॉटेल च्या समोर ज्ञानेश्वर बर्गे नावाच्या व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या आर्थिक वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशोक म्हाळसकरकडे हत्या झालेल्या ज्ञानेश्वर च्या मानलेल्या दाजीचे पैसे होते. ते पैसे घेण्यासाठी ज्ञानेश्वर हा तगादा लावत होता. मध्यरात्री अशोक आणि ज्ञानेश्वरने एकत्र मद्यपान केलं, जेवण ही केलं. त्यानंतर त्यांच्यात आर्थिक वादातून किरकोळ वाद झाला. ज्ञानेश्वर ने अशोक च्या कानशिलात लगावली. हे त्याला सहन झालं नाही. अशोक ने त्याच्या भावांना फोन करून बोलवून घेतलं. आज पहाटे तीन च्या सुमारास म्हाळसकर बंधू आणि इतर दोघांनी ज्ञानेश्वर बर्गेवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. या प्रकरणी पाच जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.